dr.satish best web design developer for mac

नांगनुर ग्रामपंचायत :

हिरण्यकेशी नदीच्या तीरावर, सुरम्य वनश्रीच्या मध्यात वसलेल नांगनुर हे आमचं गावं. गडहिंग्‍लज तालुक्यापासून 22 किमी अंतरावर वसलेले नांगनुर हे आमचं गांव. गावाला हिरण्यकेशी नदी लाभली आहे. तसेच गावामध्ये बोअरवेल व विहिरी खणल्या आहेत या पाण्‍याचा वापर पिण्‍यासाठी व शेतीसाठी केला जातो. ग्रामपंचायतीने म.ग्रा.रो.ह. योजने अंतर्गत रस्‍तांच्‍या दुतर्फा बाजुस झाडे लावलेली आहेत. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने गावामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम, प्लास्टिक निर्मुलन जनजागृती प्रभातफेरी आदी कार्यक्रम राबिविले जातात. गावामध्येच पोस्ट ऑफिस असल्याने गावातूनच पत्रव्यवहार करणे सुलभ झाले आहे. तसेच गावामध्येच शुक्रवारी बाजार भरतो.


ग्रामपंचायत कार्यप्रणाली :

आमच्या गावात ग्रामपंचायतीची स्थापना 5 सप्टेंबर 1957 साली झाली. गावची निवडणूक ही दर पाच वर्षानी होते. गावाची लोकसंख्या 2508 असून गावातील घरांची संख्या 846 आहे. गावामध्ये 510 कुटुंबे वास्तव्य करत असून ती 3 वार्डमध्ये विभागली गेली आहेत. ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी गावाचा प्रथम नागरिक म्हणून सरपंच व इतर आठ सदस्यांची गावातील नागरिकांच्या एकमताने नेमणूक केली आहे.

सरपंच
सौ.विद्या शिवाजी लोहार

गावाला रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण इ. पायाभूत सुविधा देऊन गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करते.

उपसरपंच
श्री. विकास मारुती मोकाशी

गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी माझा प्रयत्न असतो.

ग्रामसेवक
श्री. संदिप भैरू तोरस्कर

गावामध्ये सुव्यवस्था राखणे, विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.

FOLLOW US

Gadhinglaj City- Kolhapur Maharashtra

ADDRESS
Nangnoor Grampanchayat
A/p - Nangnoor Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416551

CONTACTS
Phone :

Office : 02327 – 233674